अजिंठा लेणी

अजिंठा लेण्यांची माहिती

East or west India is Best* खरंच मित्रांनो आपल्या भारताचे वैभव आणि भारतीयांची असलेले दैवी शक्ती बुद्धिमत्ता या गोष्टीची माहिती घ्यायची असेल तर निसर्गसंपन्न भागात असलेल्या अजिंठा च्या लेण्यांना आयुष्यात एकदा तरी भेट द्या.
अजिंठा लेणी ह्या औरंगाबाद जिल्ह्यातील इ.स. पूर्व २रे शतक ते इ.स. ४थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या २९ बौद्ध लेणी आहेत. जामनेर शहरापासून 30 km आणि औरंगाबाद शहरापासून १०० ते ११० कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत. ह्या लेणी नदीपात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगररांगामधील कातळांवर कोरली आहेत.
..इसवी सन पूर्व 2 मध्ये गुंफांची रचना झाली असावी आणि इसवी सन 4थ्या 5 व्या शतकात या डोंगरात कोरलेल्या गुंफांमध्ये चित्ररथ तयार झाला असावा, रंगकाम केले गेले असावे... असा पुरातत्व विभागाचा दावा आहे..बौद्ध धर्माचा विचारांचा प्रभाव ह्या लेण्यांमध्ये पाहायला मिळतो .. गौतम बुद्धाच्या कोरीव आकृत्या आणि त्यांच्या पद्मासनातील आसनस्थ कोरीवकाम पाहतांना भारतीय किती हुशार आणि कल्पक होते हे समजल्याशिवाय राहत नाही.. एकापेक्षा एक सुंदर असल्या एकूण 26 लेण्या आहेत..
आमच्या जामनेर चे जिवलग मित्रकम भाऊ सुरेश दादा यांच्या भेटींनिमित्त या लेण्या पाहण्यात आला ...सोबत आमचे मित्र *श्री सुरेश पाटील* (प्राथ शिक्षक संघ अध्यक्ष जामनेर, जळगाव), *श्री योगेश आंबरे* ( वित्त व लेखाधिकारी नाशिक ), *श्री संदीपभाऊ शेजवळ* (आदर्श शिक्षक येवला ) उपस्थित होते...
आजच्या या धावपळीच्या युगात जिवलग मित्रासोबत घालवलेले क्षण म्हणजे एक नवचेताना देणारी *ऊर्जाच* असते याचा प्रत्येय कालपासून येतोय... गणेशोत्सव निमित्ताने खास भेटायला नाशिकवरून आलेल्या मित्रांसोबत मला या लेण्या पाहण्याचा योग आला खूप खूप *मज्जा* आली ती शब्दात सांगणे कठीण आहे..
*सहकुटुंब जाण्यासारखे ठिकाण म्हणजे अजिंठा होय काय मग जाणार ना पाहायला अजिंठा हो पण सोमवारी लेण्या बंद असतात हे पण लक्षात असू द्या ..*

No comments:

Post a Comment